राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Foto
नवी दिल्ली :  राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचेे २२ नोव्हेंबर रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. छातीत त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मावळली आहे. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

खासदार रामराव वडकुते दोन दिवसांपूर्वी राजस्थान येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. तेथे पोटात त्रास होत असल्याने त्यांना दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या निधनाने धनगर समाजाचा बुलंद आवाज हरपला असून, मराठवाड्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मूळचे हिंगोली जिल्ह्यातील बाभूळगाव येथील रहिवासी असलेले वडकुते यांचा जन्म १९५४ मध्ये वाशीम जिल्ह्यातील आजोळ वारला येथे झाला. बीएस्सी पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ वीज वितरण कंपनीत नोकरी केली. आठ महिन्यापूर्वीच भाजपकडून रामराव वडकुते यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं होतं. अत्यंत प्रगल्भ आणि निष्कलंक राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती. मात्र उपचारादरम्यानची त्यांची झुंज संपली असून रामराव वडकुते यांचं दुर्दैवी निधन झालं असून हिंगोलीसह राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचा परिचय
राजकीय कारकीर्द: राज्यसभा खासदार रामराव वडकुते हे पूर्वी शेळी मेंढी महासंघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज पाहिला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते होते आणि त्यांनी पक्षाच्या कोट्यातून महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आहे.
पक्षप्रवेश: ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला .
हिंगोली जिल्हाध्यक्ष: भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, २०२१ मध्ये त्यांची हिंगोली भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ७ महिन्या पूर्वी भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवले होते.
महत्त्वाची पदे: त्यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे भाजप निवडणूक प्रमुख आणि प्रभारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. सामाजिक पार्श्वभूमी: ते धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे भाजप निवडणूक प्रमुख आणि प्रभारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

राज्यातील धनगर समाजाचे नेतृत्व करणारे नेते म्हणून ओळख
दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर या पक्षाला ओबीसी प्रवर्गातून जे धडपडणारे कार्यकर्ते लाभले, त्यात रामराव वडकुते हे एक होते. या पक्षामध्ये ते माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांचे समर्थक म्हणून पुढे आले. या पक्षाने त्यांना २००४ साली कळमनुरी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली; पण या पहिल्या निवडणुकीमध्ये वडकुते यांचा पराभव झाला. असे असले, तरी धनगर-हटकर समाजातील त्यांचे स्थान विचारात घेऊन पक्षाने त्यांना वेगळ्या जबाबदारीत गुंतविले. राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाल्यामुळे वडकुते यांना राज्यभर काम करण्याचा वाव मिळाला, तरी त्यांना स्वतःसाठी हक्काचा मतदारसंघ निर्माण करता आला नाही. २००९ साली त्यांची संधी राजीव सातव यांच्यामुळे हुकली होती; पण ङ्गराष्ट्रवादीफने त्यांना २००४मध्ये विधान परिषदेवर संधी दिली.